Latest Marathi News

आटपाडी : झरेत भीषण अपघात : अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू तर एक जखमी

आटपाडी तालुक्यातील झरे येथे सकाळी ९.०० च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघातामध्ये दोन दुचाकीचा चुराडा झाला आहे.

0 3,833

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे येथे सकाळी ९.०० च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघातामध्ये दोन दुचाकीचा चुराडा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, झरे-दिघंची रोडवरती झरे गावाजवळ पश्चिमेकडून झरेच्या दिशेने टँकर आला. टँकरच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानंतर पहिल्यांदा त्याने बिरदेव कृषी केंद्राच्या समोर असणारी दुचाकी (एमएस-10 सीसी 3077) ह्या गाडीला जोरात धक्का दिली. यामध्ये टँकरच्या मागच्या टायर खाली दुचाकी पूर्णपणे दबली गेली.

Manganga

त्यानंतर लगेचच पुढे काही अंतरावर राणी पवार ह्या उभ्या होत्या त्यांनाही ट्रकने उडवले त्यामध्ये जखमी झाल्या आहेत. सध्या त्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. तर पुढे वाघजाई बोरवेलच्या समोर टीव्हीएस लुना (एमएच-10सीए 3858) या गाडीजवळ उभ्या होत्या त्यांनाही ट्रकने उडवले. त्या उंच हवेमध्ये उडाल्या व पुन्हा जमिनीवरती कोसळल्या त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढे टँकरने सचिन राजमाने यांच्या दुकानाच्या समोरील व ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला जोरात धडक दिली त्यामध्ये भिंत कोसळली, त्यामध्ये त्यामध्ये टँकरचे टायर सटकून गेले.

एवढे होवूनही टँकर चालकाने कोणताही विचार न करता टॅंकर अति वेगाने कराड पंढरपूर हायवेने शेनवडी ता. माण च्या दिशेने घेऊन गेला. त्यानंतर गावातील तरुणांनी टँकरचा पाठलाग करून पकडले त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!