Latest Marathi News

३२ वर्षीय महिलेने १७ वर्षीय मुलाचे अपहरण करत केला बलात्कार!

0 894

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात एका ३२ वर्षीय महिलेनं १७ वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिन्यांनंतर संशयित महिलेला अटक केली आहे. ही घटना घडली आहे.

 

एका वृत्तवाहिनीनुसार, आरोपी महिला ही चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रगौली परिसरात राहते. ऑक्टोबर २०२२ मध्ये या महिलेने घराशेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला. दरम्यान, मुलाच्या अपहरणाची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सदरील मुलाचा तपास सुरू केला होता. यावेळी मुलगा हा प्रयागराज येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतलं.

Manganga

 

दरम्यान, या महिलेनं आपल्याला वेगवेगळे अमिष दाखवून तसेच फूस लावून पळवून नेलं होतं, असा जबाब १७ वर्षीय मुलाने पोलिसांना दिला आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!