मुंबई: संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या लवंगी फटाक्याच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, “कधीकाळी देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षनेते होते. विधानसभेचा वापर त्यांनी भष्ट्राचाराविरोधात आवाज उठवण्यात केला होता. त्यांनी सरकारमधील मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढली आणि राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं जी विरोधी पक्षाने काढली आहे ही त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे का?’, असा सवाल राऊतांनी केला.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘अजून अधिवेशन संपलेलं नाही, फक्त एक-दोन नव्हे मंत्री नाही तर संपूर्ण सरकारच अडचणीत आहे. जे शिवसेनेतून फुटून गेलेले आहेत. आणि ज्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. त्या प्रत्येकांचं तुम्ही लवंगी फटाके म्हणा.. बॉम्ब म्हणा… लवकरच फुटतील, असा इशाराही खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे नागपुरात गेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.