मुंबई: विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. तसेच, सभागृहात सीमावादावरून देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
फडणवीस म्हणाले, “आतापर्यंततरी हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणताय ते लवंगी फटाकेदेखील नाहीत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते आम्ही बघू असं फडणवीस म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव मांडतील. मला आश्चर्य वाटते की अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, त्यावेळे त्यांनी काहीच केलं नाही. सीमाप्रश्न आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. तर सीमाप्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे. तेव्हापासून वर्षानुवर्षे ज्यांची सरकारं आहेत, ते आता असं भासवत आहेत जणूकाही हे सरकार आल्यानेच सीमाप्रश्न तयार झाला असे फडणवीस म्हणाले.