मुंबई: येत्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, असा गौप्यस्फोट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी 2019 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी मला 2024 मध्ये तुमच्या पाठीशी उभे राहू, असा शब्द दिला होता. तो शब्द आता पिता-पुत्र पाळतील. बाबर हे खानापूर मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत, असं पडळकरांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच खानापूर तालुक्यातील मोही येथील ग्रामपंचायतीत हजेरी लावली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार केला. यावेळी बोलताना पडळकरांनी हा गौप्यस्फोट केला आहे.