नागपूर : राज्यात आजच्या नागपूर अधिवेशनात महाविकास आघाडीचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील जमीन खासगी व्यक्तीला विकली, असा आरोप विरोधकांनी केला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी गायरान जमीन विक्री करण्यास मनाई केली असताना देखील संजय राठोड यांनी ही जमीन विकली.

याशिवाय वाशिमचे जिल्हाधिकारी आणि मंगळूरपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असं सांगितलं असताना देखील संजय राठोडांनी जमीन विकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.