Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, मंगळवार २७ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 728

मेष:-
अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. सामाजिक स्तरावर मान मिळेल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील.

 

 

वृषभ:-
व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल.

Manganga

 

मिथुन:-
आजचा दिवस मनाजोगा जाईल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. दानधर्म कराल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल.

 

कर्क:-
अति विचार करत बसू नका. गूढ गोष्टी जाणून घ्याल. अनपेक्षित लाभाची शक्यता. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल.

 

सिंह:-
काही नवीन मार्ग सापडतील. काही सकारात्मक बदल घडून येतील. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल.

 

कन्या:-
वादाचे प्रसंग टाळावेत. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. इतरांवर फार विसंबून राहू नका. आपले निर्णय आपणच घ्यावेत. खोटी स्तुती करणार्‍यांपासून सावध राहावे.

 

तूळ:-
मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आनंदाची अनुभूती मिळेल. वातावरण सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल.

 

वृश्चिक:-
प्रवास मजेत पार पडेल. कुटुंबासमवेत फिरायला जाल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल.

 

धनू:-
भावंडांशी संबंध सुधारतील. जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. शेजार्‍यांना मदत कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील.

 

मकर:-
जोडीदार तुमच्यावर खुश होईल. बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.

 

कुंभ:-
ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. मानसिक अस्थिरता दूर होईल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल.

 

मीन:-
कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . अतिविचारात वेळ वाया घालवू नका. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!