मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान घोटाळ्यावरून विरोधकांकडून गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कथित गायरान घोटाळ्यावरून पहिली प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘उद्या सभागृह सविस्तर उत्तर देईल’,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे उद्या सभागृहात अब्दुल सत्तार काय उत्तर देतील, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहे.
दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान घोटाळ्याचे आरोप करत राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन तब्बल 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला. या आरोपांनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार नॉटरिचेबल झाले होते.