Latest Marathi News

BREAKING NEWS

 

‘येथे’ शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती!

0 505

मुंबई: . वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यापार्श्वभूमीव कोरोना विषाणूचा धोका पाहता खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारनं मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. केंद्र मंगळवारी देशभरात मॉक ड्रील करण्यात येणार आहे.

 

 

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये सिनेमागृह, शाळा आणि कॉलेजमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेकजण पब, हॉटेल, बार आणि पर्यटनस्थळावर गर्दी करतात…. कर्नाटक सरकारनं पब, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मास्क अनिवार्य केला आहे. तसेच राज्यभरात नवीन वर्षाचं स्वागत मध्यरात्री एक वाजेपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 27 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग क्षमता वाढवणे आणि RT-PCR, RAT किट्सची उपलब्धता, टेस्ट उपकरणांची उपलब्धता याबाबत देखील काळजी घेतली जाईल. आरोग्य संसाधनांची उपलब्धता, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी, एसपीओ 2 प्रणाली, पीपीई किट, एन-95 मास्क इत्यादींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रानं राज्यांना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.