नवी दिल्ली: आज, सोमवारी हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमावादावरून चांगलेच कान टोचले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा सीमावादावर हस्तक्षेप केला. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होऊ नये, तसेच, त्यांनी (उद्धव ठाकरे) तर सीमावासियांच्या योजना बंद केल्या. मी स्वतः जेलमध्ये जाऊन आलो आहे. त्यामुळं इतर लोकांनी शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दिलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावादावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.