Latest Marathi News

BREAKING NEWS

 

व्हिडीओ ! प्रेयसीला मारहाण करणाऱ्या प्रियकराचं घरं बुलडोझरने पाडलं!

0 688

मध्यप्रदेश: मध्यप्रदेश मधील कुटुंबियांची परवानगी नसल्यामुळे प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकाराने प्रेयसीला रस्त्यात बेदम मारहाण केली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

 

 

माहितीनुसार, प्रेयसीने प्रियकराला लग्नाला नकार दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीला भररस्त्यात बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. ज्यावेळी प्रेयसीला मारहाण करण्यात आली.दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मुलींच्या आईने पोलिसांकडे कसल्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. पण पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने आरोपीचं घर बुलडोझरने पाडलं आहे. त्याचा सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.