मुंबई: महाविकास आघाडीसोबत लवकरच वंचित बहुजन आघाडी दिसणार, असल्याचे मोठे भाष्य सुभाष देसाई यांनी केलं आहे.
यावेळी ते म्हणाले, “शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्र येण्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर त्यांचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये बैठका होत आहेत. पुढची वाटचाल अधिक भक्कमपणे व्हावी कुठली शंका राहू नये यासाठी या बैठका महत्त्वाच्या आहेत. चर्चांचे टप्पे महत्त्वाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी कोणाचाच विरोध नाही. मला जी माहिती आहे त्यामध्ये मी सांगू शकतो आणि चर्चेतूनच पुढे जाऊ शकतो, असं देसाई म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडी सुद्धा लवकरच पाहायला मिळेल, असं देखील सुभाष देसाई यांनी म्हटलं.