Latest Marathi News

‘यांनी’ सरकारची 150 कोटींची जमीन मातीमोल किंमतीत विकली: अजित पवार!

0 187

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवसही चांगलाच गाजला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर वाशिममधील तब्बल 150 कोटी रुपयांची जमीन अगदी मातीमोल दरात एका व्यक्तीला विकल्याचा गंभीर आरोप केला.

 

पवार म्हणाले, “अब्दुल सत्तार यांनी तब्बल 37 एकर जमीन लाटल्या आहेत. विशेष म्हणजे या जमिनीची किंमत 150 कोटी इतकी होती. पण ती जमीन अब्दुल सत्तार यांनी मातीमोल किंमतीत एका व्यक्तीला विकली, सरकारची संपत्ती कुणाला देण्याचा अधिकार नाही. त्यांची अशी अनेक वेगवेगळी प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा”, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, “कृषी विभागाला वेठीस धरलं आहे. मी अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की दादा आम्हाला कोट करु नका. पण न विचारता आमचे तिथे फोटो टाकले आहेत”, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले.

 

दरम्यान, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे.  या आठवड्यात विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!