नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जातात. सरकार निष्क्रिय आहे, असेही आरोप केले जातात. यावर बोलताना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, आरोप-प्रत्यारोपाची काही हद्द असते. नागपूरला अधिवेशन घ्या, असं सांगितलं जातं. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी वल्गना केली जाते. प्रत्येक्षात करोडो रुपये अधिवेशनावर खर्च होतात. तिथं कामकाज केलं जात नाही. ही निंदनीय बाब आहे. चर्चेद्वारे सर्व गोष्टी सोडविल्या जाऊ शकतात, मात्र नुसता गोंधळ घालायचा नि सरकार बदनाम करायचं असं षडयंत्र सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच ते, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हणाले, “आधी चौकशी करणार की, नाही. सरळ फाशी लावणार का, असा थेट आरोप त्यांनी केला. आधी चौकशी करा. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, अही ते म्हणाले.