नागपूर: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या महिलेची एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. तसेच या महिलेला युवासेनेकडून बळ दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे. शेवाळे यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले, “दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे पैसे पुरवत आहेत. त्यामुळे शेवाळे यांना अटक करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

दरम्यान भास्कर जाधव यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. सरकारमध्ये ताळमेळ नाही. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत. हे सरकार म्हणजे बोलाचा भात अन् बोलाचीच कढी आहे. भाजप सारखे निर्लज्ज लोक पाहिले नाहीत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.