Latest Marathi News

BREAKING NEWS

सर्वसामान्यांना झटका! दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

0 533

मुंबई: दिल्ली-NCR मधील ग्राहकांना झटका बसणार आहे. मदर डेअरीने फुल क्रीम, टोन्ड आणि डबल टोन्ड दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली आहे. हे दर मंगळवारपासून लागू होतील.

 

 

माहितीनुसार, मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करून 66 रुपये प्रतिलिटर केली आहे. तर टोन्ड दुधाची किंमत 51 रुपये प्रति लिटरवरून 53 रुपये केली आहे. त्याचबरोबर डबल टोन्ड दुधाची किंमत 45 रुपये प्रतिलिटरवरून 47 रुपये करण्यात आली आहे.

Manganga

 

दरम्यान, मदर डेअरीने 2022 मध्ये दुधाच्या दरात पाच वेळा वाढ केली आहे. ताज्या दरवाढीपूर्वी मार्च, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात किमती वाढवण्यात आल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!