Latest Marathi News

BREAKING NEWS

लग्नाला नकार दिला म्हणून भररस्त्यातच बॉयफ्रेंडने प्रेयसीसोबत केले संतापजक कृत्य!

0 587

मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रियकर त्याच्या प्रेयसीसोबत संतापजक कृत्य करताना दिसून येत आहे.

 

एका हिंदी वृत्तवाहिनीनुसार, ही घटना मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील आहे. या व्हिडीओत एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. हे दोघेही प्रियकर आणि प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, दोघेही बाहेर फिरायला गेले असताना, तरुणाने या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. यामुळे या तरुणाला राग अनावर झाला. त्याने भररस्त्यात तरुणीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

Manganga

 

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की तरुण आणि तरुणी दोघेही रस्त्यावरून जात आहे. त्यानंतर त्यांच्यात काहीतरी गोष्टीवरून वाद सुरू होता. त्यानंतर तरुण हातात असलेलं साहित्य एका बाजूला ठेवून या तरुणीला मारहाण करायला सुरुवात करतो. त्यांनतर ती काही वेळानंतर जमिनीवर कोसळते. त्यानंतरही तो तिला मारहाण करीत राहतो. आणि जेव्हा हा तरुण मारहाण करत होता. तेव्हा तिथं उपस्थित त्याच्या मित्राने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!