मुंबई: अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं आहे.
अजित पवार म्हणाले, दहा पेक्षा जास्त असलेल्या तालुक्यांना वेगळं पॅकेज आणि दहा पेक्षा कमी असलेल्यांना वेगळं पॅकेज. कृषीबाबत जो कार्यक्रम सत्तारांनी घेतला ती लुबाडणूक सुरू आहे. कृषी मंत्री सत्तेत आल्यापासून बेताल वक्तव्य करत आहेत. को्ट्यवधींचा घोटाळा सत्तारांनी केला आहे. आम्ही अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशानाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.