नागपूर: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं मत एका डॉक्टराने व्यक्त केलं होतं. तोच धागा पकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांनी या प्रकरणी त्या डॉक्टरांचं ताबडतोब स्टेटमेंट नोंदवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगितलेजात आहे.
माहितीनुसार, दिशा सालियान प्रकरणी तात्काळ डॉक्टरांचे स्टेटमेंट घेतलं पाहिजे. दिशाची हत्या करण्यात आल्याचं एका डॉक्टरांचं मत होतं. त्यामुळे त्या डॉक्टराची साक्ष नोंदवून घेतली पाहिजे. तसेच या प्रकरणी योग्य तो खुलासा झाला पाहिजे, दिशा सालियन प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांना अटक केली पाहिजे. दिशा सालियनचे मारेकरी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्यासमोर आले पाहिजेत. जे कोणी आरोपी असतील, ते कुणीही असू देत, त्यांची नावे जाहीर केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अखेर एका जीवाचा हा प्रश्न आहे, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, मला वाटतं की कूपर हॉस्पिटलचा रिपोर्ट आता बाहेर पडलेला आहे. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे समजत आहे. त्यामुळे आता मोठ्या घडामोडी घडतील, असा दावाही लाड यांनी करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगितले जात आहे.