नागपूर: उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले, एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली. तशी धमक आपल्यात आहे का? आपण तशी भूमिका मांडू शकतो का? असा सवाल करतानाच सीमावादाचा प्रश्न सोडवला गेला नाही. कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात. ते या विषयावर बोलणार आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

तसेच ते पुढे म्हणाले, “तुम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता सीमापार गेला. आता तिकडे गेला म्हणून बोलायचं नाही असं नाही. तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसायचं असं काही नाही, असा चिमटा काढतानाच किती काळ मराठी माणसाने लाठ्या खायच्या? किती काळ फक्त या विषयावर चर्चा करणार आहोत? असा सवाल त्यांनी केला.