पारोळा (जळगाव) : मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किमी अंतर असलेल्या वीचखेडा गावांजवळ सकाळी सात वाजेच्या सुमारास टँकर व कार यांच्यात अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सकाळी सात वाजेच्या सुमारास कार व ट्रॅंकरचा अपघात झाला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या टॅंकरने कारला जोरदार धडक दिल्याने यात पारोळा नगरपालिकेच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा) व एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉ. निलेश मंगळे (वय ३५, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप पवार (वय ३७) हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.