Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, सोमवार २६ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 932

मेष:-
उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. शारीरिक दृष्ट्‍या सक्षम राहाल. आर्थिक प्रश्न सुटेल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल.

 

वृषभ:-
थोरांचे आशीर्वाद घेता येतील. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल.

Manganga

 

मिथुन:-
कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका.

 

कर्क:-
अचानक मूड बदलू शकेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल.

 

सिंह:-
विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

 

कन्या:-
नवीन पुस्तक खरेदी करू शकता. पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. नवीन गोष्टीत रस घ्याल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल.

 

तूळ:-
घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. मनातील चिंता दूर होतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत.

 

वृश्चिक:-
भावंडांना मदत कराल. पराक्रमात वाढ होईल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील.

 

धनू:-
बोलण्यात माधुर्य राखाल. कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. चांगला आर्थिक लाभ संभवतो. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल.

 

मकर:-
जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. भविष्याची चिंता करत बसू नका. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील.

 

कुंभ:-
कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. काही खर्च अचानक सामोरे येतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल.

 

मीन:-
कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल. नवीन खरेदी करता येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!