आटपाडीत गदिमा लघुपट महोत्सवास सुरुवात
आटपाडी येथे पंचम फिल्म प्रोडक्शन निर्मित गदिमा लघुपट महोत्सवास सुरुवात झाली.
आटपाडी : आटपाडी येथे पंचम फिल्म प्रोडक्शन निर्मित गदिमा लघुपट महोत्सवास सुरुवात झाली.
आटपाडी तालुका मेडिकल असोसियांचे अध्यक्ष डॉ. एम. वाय. पाटील यांच्या हस्ते स्क्रिंनिंगचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना डॉ.एम. वाय. पाटील म्हणाले, जावीर कुटुंबियांनी स्वत:ला कला क्षेत्रात वाहून घेतले आहे. रविकिरण जावीर यांनी समाजातील अनेक अंधश्रद्धा यावर प्रहार करत केलेली लघुपटांची निर्मितीची दखल घेवून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत यांनी विधवा बाबत ठराव घेतले हे जावीर कुटुंबीयांचे यश असल्याचे नमूद केले.

याप्रसंगीआटपाडी तालुका काँगेसचे माजी तालुकध्यक्ष प्रदीप पाटील सिने अभिनेते शेटफळे ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय देवकर, जे.आर. चव्हाण, धनंजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करत गदिमा लघुपट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमोल माने सर दिघंची, चौंडेश्वरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राहुल सपाटे, विजय ताटपुजे, सुनील ऐवळे, महेश बनसोडे, शिक्षक समितीचे माजी तालुकध्यक्ष शाम ऐवळे, सनी कदम यांच्या सह मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सू्रसंचालन समाधान ऐवळे यांनी केले.
या लघुपट महोत्सवामध्ये धडा दे लेसन, होप ॲण्ड हॉनर, बृहन्नाले, बाघाशेखरी, एम.ए.बी.एड. (विनाअनुदानित), दरमजल, मागणी, स्माईल प्लीज, उद्वेग, पावस्या, पाम्लेट, दळण, कावळा उड, यु. मस्ट स्पीक, झेलम, जोडवं या लघुपटांचे स्क्रीनिग होणार आहे.
तर मै दिवाणी, शोधू कुठे मी हे अल्बम साँग प्रदर्शित होणार आहेत. दुपारी ४.१५ वा. मातृवंदना ग.दि. माडगूळकर, संपदा अष्टेकर तर भरत नाट्य नृत्य सोह महेश वर्षा या शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. तर भिमराव मुढे यांच्या हस्ते ४.३० ते ५.३० या दरम्यान बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.
<span;>