मुंबई: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकपाल कायद्यावरील टीकेवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला जोरदार टीका केली आहे.
पाटील म्हणाले, संजय राऊत मधल्या काळात हवापालट करून आले होते. त्याचा उपयोग झाला नसल्याचं दिसून येत आहे. तसेच, संजय राऊत यांनी बोलताना भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया विखे पटलांनी दिली आहे. तसेच राज्यात अनेक विकासकाची कामे सुरू असताना माध्यमांनी संजय राऊतांसारख्या मुक्त फळे उधळणाऱ्या लोकांना महत्व देऊ नये असेही विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, लंपी आजाराच्या काळामध्ये शासकीय पशुवैद्यकीय सेवा कमी पडली असून भविष्यामध्ये शासकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार करणार असल्याचे राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले.