Latest Marathi News

दिशा सालियान प्रकरणात CBIनेच केला मोठा खुलासा!

0 555

मुंबई: दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआयने तपास केला आहे असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. आता हा दावा सीबीआयने स्वतः खोडून काढला आहे. दिशा सालियान हिच्या मृत्यूचा तपास सीबीआयने केलाच नाही अशी माहिती स्वतः सीबीआयकडून देण्यात आली आहे.

 

माहितीनुसार, दिशा सालियान हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा दावा सातत्याने भाजपचे आणि शिंदे गटाचे काही नेते करत आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिशा सालियानच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात एसआयटीची घोषणा केली आहे.

Manganga

 

दरम्यान, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीसांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, आता सीबीआयने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असून सीबीआयने दिशा सालियान प्रकरणाची चौकशी केली नसल्याचं म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!