आटपाडीत उद्या गदिमा लघुपट महोत्सवाचे आयोजन : आटपाडीकरांसाठी लघुपटाची मेजवानी : कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन
आटपाडी : आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिर हॉल या ठिकाणी पंचम फिल्म प्रोडक्शन आयोजित गदिमा लघुपट महोत्सव आज संपन्न होत आहे.
या स्क्रीनिग सोहळ्याचे उद्घाटन दि. २५ रोजी सकाळी ९.३० वा. आटपाडी तालुका मेडिकल असो. अध्यक्ष डॉ. एम.वाय. पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे कृषी अधिकारी सचिन भोसले, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, डॉ. अनिरुद्ध पत्की, ॲड. धनंजय पाटील, डॉ. विष्णू पाटील, डॉ. एन.जे. कदम, इंजि. असिफ कलाल, सिने अभिनेते व शेटफळचे उपसरपंच विजय देवकर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४.३० वा. बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक भीमराव मुढे असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहा. गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर हे आहेत. तर कार्यक्रमास श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. विजय लोंढे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, बापुसाहेब चंदनशिवे, बालाजी वाघमोडे, इंजि. महेश पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संयोजक समाधान ऐवळे व अनिषा जावीर यांनी केले आहे.