आटपाडी : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘बार्डो’ चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक भीमराव मुढे हे आज दिनांक २५ रोजी आटपाडी तालुका दौऱ्यावर येत असून आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिर हॉल या ठिकाणी पंचम फिल्म प्रोडक्शन आयोजित ‘गदिमा लघुपट महोत्सव’ या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.
आटपाडी तालुक्यात प्रथमच ठिकाणी पंचम फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा लघुपट महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे. या महोत्सवास माणदेशातील प्रसिद्ध कवी, लेखक, ग.दि. माडगुळकर यांचे नाव देण्यात आहे.

या महोत्सवामध्ये धडा दे लेसन, होप ॲण्ड हॉनर, बृहन्नाले, बाघाशेखरी, एम.ए.बी.एड. (विनाअनुदानित), दरमजल, मागणी, स्माईल प्लीज, उद्वेग, पावस्या, पाम्लेट, दळण, कावळा उड, यु. मस्ट स्पीक, झेलम, जोडवं या लघुपटांचे स्क्रीनिग होणार आहे.
तर मै दिवाणी, शोधू कुठे मी हे अल्बम साँग प्रदर्शित होणार आहेत. दुपारी ४.१५ वा. मातृवंदना ग.दि. माडगूळकर, संपदा अष्टेकर तर भरत नाट्य नृत्य सोह महेश वर्षा या शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. तर भिमराव मुढे यांच्या हस्ते ४.३० ते ५.३० या दरम्यान बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.