नवी दिल्ली: चीनसह जगभरातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.

दरम्यान, चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.