Latest Marathi News

BREAKING NEWS

“फडणवीस, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”: ‘या’ भाजप नेत्याचा हल्लबोल!

0 755

 

पंढरपूरः पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी कुणीही आड आलं तर पंढरपूरचं कॉरिडोअर होणारच, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यालाच सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिले आहे.

 

Manganga

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मी म्हणतोय, हा विकास प्रकल्प होणार नाही. फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. एवढी घाई कशासाठी आहे… विकास करायचाच असेल तर इथली चंद्रभागा नदी शुद्ध करा, इथे विमानतळ बांधा, एवढे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा.. या कॉरिडोरवरून कुणा-कुणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

 

 

दरम्यान, देशातील 15-20 साधूंच्या ताब्यात इथली मंदिर द्या, अशी अजब मागणीही माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!