मुंबई: पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी हे आज, २४ डिसेंबरला पंढरपूरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत असं धक्कादायक विधान केले आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत असं म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीका केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्यांचं प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे अशी टिप्पणी त्यांनी केली.