मुंबई: लोअर परळ येथे एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुंबईच्या लोअर परळ परिसरात वरळी येथून मुलीला तरुणाने घरी आणले. तिथे आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. ज्या तरुणाने तिला घरी आणले, त्याच्यासोबत पीडितेचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा आरोपींपैकी तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या तिघांनाही डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.