आटपाडी : धर्मांतरच्या विरोधात वीर मावळा संघटना आक्रमक : प्रशासनास दिले निवेदन : कारवाई न झाल्यास महामोर्चा काढणार
धर्म परिवर्तनाचे मोठे रॉकेट उधवस्त करावे
आटपाडी : आटपाडी शहरातील वरद हॉस्पीटल मधील आय.सी.यु.मध्ये उपचार घेण्याऱ्या रूग्णाच्या डोक्यावर हात ठेवून तंत्रमंत्राचा वापर करून जादूटोणा, भोंदूगीरीने उपचार करून धर्मांतराचा प्रयत्न करणारे संजय गेळे व अश्विनी गेळे यांच्या विरुद्ध वीर मावळा संघटना आक्रमक झाली असून प्रशासनास दिले निवेदन देण्यात आले आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास महामोर्चा काढणार असल्याचे वीर मावळा संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेळे पती-पत्नी यांनी सुशांत ढाबा व त्याच्या पाठीमागे बाजूस असलेला चर्च मध्ये अनेक कुटुंबियांचे धर्मांतर केले आहे. गरीब, गरजू, सुशिक्षीत बेरोजगार लोकांना अमिष दाखवून त्यांना धर्मातर करणेस प्रवृत करत असलेल्या चर्चा वारंवार ऐकण्यास येत आहेत.
सदरचे धर्म परिवर्तनाचे कार्य हे आटपाडी पुरते मर्यादित राहिले नसून महाराष्ट्रात पसरले असावे. तरी पोलीसांनी योग्य प्रकारे तपास करून हे धर्म परिवर्तनाचे मोठे रॉकेट उधवस्त करावे व हिंदु धर्माच्या भावना लक्षात घेवून संजय गेळे व अश्विनी गेळे यांना अटक करून यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.एन.कदम साहेब, अतुल गायकवाड, संपत पाटील, दीपक गायकवाड, अमित ऐवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
