Latest Marathi News

घरबसल्या बनवू शकता तुम्ही राशन कार्ड: ‘असा’ करा अर्ज!

0 238

मुंबई: 2023 मध्येही सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत राशन देणार आहे. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन एक वर्षासाठी वाढवले आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन सहज बनवू शकता. तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न, पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता आणि तुमच्या कार्डची स्थिती देखील पाहू शकता.

 

यासाठी खालील कृती करा:
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर http://mahafood.gov.in/ वेबसाइटला भेट द्या.

Manganga

होमपेजवर लॉग इन करा आणि ‘NFSA 2013 अप्लिकेशन फॉर्म’ वर क्लिक करा.

तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती भरावी लागेल. तुम्हाला तुमची कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावे लागतील.

यानंतर तुम्हाला ऑनलाइन रेशन कार्ड फी भरावी लागेल. फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे रेशन कार्ड बनवण्यासाठी तुमचा अर्ज केला जाईल. अर्जदाराला वेगवेगळ्या श्रेणीनुसार 5 रुपये ते 45 रुपये शुल्क भरावे लागते.

 

दरम्यान, तुमचा अर्ज आणि त्यात दिलेली माहिती फील्ड ऑफिसरकडून पडताळून पाहिली जाईल. माहिती बरोबर आढळल्यास महिनाभरात तुम्हाला शिधापत्रिका दिली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!