औरंगाबाद : आता आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय.शिवसेना ठाकरेंची राहिलेली नाही, तर आताची राष्ट्रवादीची आहे, असं आमदार संजय शिरसाट म्हणालेत.
शिरसाट म्हणाले, “काल सभागृहात जे झालं ते सर्वांनी पाहिलं त्यामुळे आता आम्ही काही बोलायची गरज नाही. ठाकरेगट राष्ट्रवादीच्या दबावाखालीच काम करतो, निर्णय घेतो हे आता स्पष्ट झाले आहे, राष्ट्रवादीने ठाकरेगटाला दत्तक घेतलं आहे, असे म्हणत शिरसाट यांनी ठाकरेगटाला टोमणा मारला आहे.

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात सभागृहात बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख केला. त्यानंतर आज आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केला.