लोटेवाडी : लव्हकुमार डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगचा आज वर्धापनदिन : यशस्वी उद्योजकांचा सत्कार व सिफा पुणेकर यांचा लावण्याचा कार्यक्रम
दिघंची : सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथील लव्हकुमार डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगचा आज वर्धापनदिन असून या निमित्त यशस्वी उद्योजकांचा सत्कार व सिफा पुणेकर यांच्या बहारदार लावण्याचा कार्यक्रम आज दिनांक २४ रोजी लोटेवाडी येथे संपन्न होणार आहे.
फ्लेक्स प्रिटींग क्षेत्रात अल्पावधीतच लव्हकुमार डिजिटल ने आटपाडी, सांगोला, माण तालुक्यात मोठे नाव कमावले आहे. उत्कुष्ट सेवा व क्वालिटी यामुळे लव्हकुमार डिजिटलचे फ्लेक्स प्रिंटींग क्षेत्रात मोठे नाव आहे.

आज दिनांक २४ रोजी या व्यवसायाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त लोटेवाडी ता, सांगोला, जि. सोलापूर येथे सायंकाळी ६.०० वा. यशस्वी उद्योजकांचा सत्कार व सिफा पुणेकर यांच्या बहारदार लावण्याचा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक प्रा. बाळासाहेब सरगर, सचिन सरगर, लव्हुकुमार सरगर, भाग्यश्री सरगर यांनी केले असून कार्यक्रमाचे संयोजक लखन खांडेकर, महेश भंडारे, विकास सावंत, सुमित सावंत, मनोज जाधव, रोहन खांडेकर, गौरी गाडे, श्रुती शिंदे हे आहेत.