Latest Marathi News

BREAKING NEWS

ब्रेकिंग : भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात ! आमदार गोरे जखमी

आज पहाटे ते मुंबईवरून त्यांच्या निवासस्थानी जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गोरे यांची गाडी पुलाचा कठडा तोडून थेट खाली ५० फूट खोल नदीत कोसळली. 

0 3,254

फलटण :  भारतीय जनता पार्टीचे माण-खटावचे आमदार व सातारचे भाजप जिल्हा अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमी लगत हा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात गेली.

 

 

Manganga

 

 

अपघातात आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या अपघातात आमदार जयकुमार गोरे जखमी झाले आहेत. पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे.

 

आज पहाटे ते मुंबईवरून त्यांच्या निवासस्थानी जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गोरे यांची गाडी पुलाचा कठडा तोडून थेट खाली ५० फूट खोल नदीत कोसळली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!