नागपूर : अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनची चौकशी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या आरोपांनंतर आता राज्य गुप्तचार यंत्रणा ही चौकशी करणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन हे प्रकरण चोरीच्या दिशेने वळवण्सास सांगितले गेले. उद्धव ठाकरे यांनी आरती सिंग यांना फोन केल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी विधीमंडळात केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप रवी राणा यांनी केला होता.

दरम्यान, यावर उत्तर देताना शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, राज्य गुप्तचर आयुक्तांना या सगळ्या गोष्टी कळवल्या जातील. येत्या पंधरा दिवसांच्या आत सविस्तर अहवाल मागवला जाईल. यामध्ये कुणाचा फोन आला का हे तपासलं जाईल, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.