Latest Marathi News

‘बेशरम रंग’ गाण्याच्या वादावर स्मिता गोंदकर मोठे वक्तव्य; म्हणाली, “आता तर भगव्या रंगाची ब्रा घालण्याचे….”

0 474

मुंबई: पठान चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत जात होत. यामुळे राजकीय पक्ष, हिंदू संघटनानी या गाण्याच्या आणि चित्रपटाच्या विरोधात टीका आणि आंदोलने केली. आता या भगव्या रंगाच्या बिकिनीवर मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.

 

स्मिता गोंदकर म्हणाली की, “हा जो काही रंगाचा वाद सुरु आहे त्याने मला खरंच भीती वाटू लागली आहे. मी तर पहिल्यांदा माझं वॉर्डरोब चेक केलं आणि त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही नाही ना हे आधी पाहिलं. आता तर भगव्या रंगाची ब्रा घालण्याचे देखील दडपण येईल. चुकून कुठे कुणाच्या नजरेस पडली तर आपलं काय करतील हे लोक याचा विचारही करून भिती वाटतेय”

Manganga

 

 

तसेच, “खरंतर आता जग पुढे चाललंय. ग्लोबलायझेनमुळे पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढतोय,पण त्याहूनही अधिक आता आपण हवामान बदलतं तसे कपडेही घालतो. मग हा तर सिनेमा आहे…जागतिक स्तरावर तो पाहिला जातो. आणि सिनेमातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात. आणि जर ते सुंदर दिसत असतील तर का घालू नयेत. कुठे ते चांगले दिसले नसते तर प्रश्न वेगळा होता. पण उगाचच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं जो वाद सुरु आहे तो मला काही पटलेला नाही,” अशीहि ती म्हणाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!