नवी दिल्ली: सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा भाग होता, जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते., 23 डिसेंबर 2022 रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान चार जखमी जवानांना विमानाने हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन अधिकारी आणि 13 सैनिकांना मृत्यू झाल्याची माहिती आहे.