नागपूरः विधानसभेत चुकीची माहिती दिल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. मात्र नाना पटोले स्वतः महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष राहिले असताना यावरून हक्कभंग आणणार हे ऐकून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तर नाना पटोलेंची बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं.
भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, काँग्रेसचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ते हक्कभंग आणण्याची भाषा करतायत, असं वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात चुकीची माहिती दिली, यावरुन सोमवारी हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला. दिल्लीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नाना पटोले गेले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.