पुणे : महाविकास आघाडीत सगळं काही ठीक आहे असं वाटत नाही. महाविकास आघाडीत मोठी फूट पडणार असा चंद्रशेखर यांनी तसा दावा केला आहे.
बावनकुळे म्हणाले, “आता फ्लोअर टेस्ट घेतली तर आमच्याकडे १८४ आमदार असतील, तसेच, सध्या शिंदे-फडणवीस सरकारकडे १६४ आमदारांचं संख्याबळ आहे, असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “विरोधक गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. काँगेस-राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे सगळे वेगळीकडे आहेत. विरोधकांकडे विषय नाही, त्यामुळे ते आव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटलांचं निलंबन नियमाला धरून झालं आहे. जर नसेल असं वाटतंय तर विरोधकांनी कोर्टात जावं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायदेतज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी जे केलं ते योग्य पद्धतीने झालं असेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.