अकोला: अकोल्यातील बाभूळगाव येथील तरुणाने 24 वर्षीय तरुणाने ‘झूठा प्यार था तेरा’ असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवत रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. अक्षय गणेश शिरसाट (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अक्षय याने आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. अक्षयने ‘झूठा प्यार था तेरा’ असे सोशल मीडयावर स्टेटस ठेवले असून त्यानंतर आत्महत्या केली.

दरम्यान, अक्षयजवळ एक चिठ्ठीदेखील सापडली आहे. यात नेमके काय नमूद आहे, हे अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.