धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान असवैधानिक शब्द उच्चारल्याबद्दल निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान या निलंबनाच्या कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
माहितीनुसार, धुळ्यात विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांतर्फे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर करून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्यातवरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी; या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.