बुलडाणा: बुलडाण्यात जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावात महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केली आहे. रमाबाई जाधव असे या जखमी झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, , गुरुवारी (२२ डिसेंबर) १५ जणांनी अचानक रमाबाई जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. तू फुकट सरपंच झाली, असं म्हणत आरोपींनी महिला सरपंचासह तिच्या मुलावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही किरकोळ जखम झाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महिला सरपंचाने थेट जानेफळ पोलीस ठाणे गाठले पण तिथे त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे त्या हतबल झाल्या. त्यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असूनही पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.