Latest Marathi News

आटपाडी : धर्मांतराचे आरोप झालेल्या गेळे पती-पत्नी वर अखेर गुन्हा दाखल

0 2,699

आटपाडी : आटपाडीतील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करून त्या कुटूबियांचे धर्मांतराचे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असलेल्या गेळे पती-पत्नी वर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी येथील वरद हॉस्पिटल मध्ये संजय गेळे व त्याची पत्नी अश्विनी गेळे या अतिदक्षता विभागामध्ये जावून रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र करताना व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत असून सदर व्यक्तींच्या कृत्याला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे.

Manganga

परंतु सदर प्रकरणामध्ये संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार भा.द.स.कलम ४५१, ३४ सह नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम सन २०१३ चे कलम ३ (१) (२) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १९ रोजी दुपारच्या सुमारास यातील आरोपी संजय गेळे व त्याची पत्नी अश्विनी गेळे यांनी आपल्या अंगी दिव्य शक्ती असलेचे भासवून जादू टोना करून पेशंट बरा करणेचे उद्देशाने वरद हॉस्पिटल मधील अति दक्षता विभागामध्ये पेशंटचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती देवून पेशंट सोनाली शिवदास जिरे रा. मापटेमळा ता. आटपाडी हिचे कपाळावरून बोटे फिरुवून टॅब मधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असलेचे भासवून जादूटोणा-भोंदूगिरी केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!