आटपाडी : धर्मांतराचे आरोप झालेल्या कुटुंबियांच्या हॉटेलवर शुकशुकाट
आटपाडीतील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करून त्या कुटूबियांचे धर्मांतराचे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असलेल्या गेळे कुटुबियांचे हॉटेलवर संध्याकाळी शुकशुकाट होता.
आटपाडी : आटपाडीतील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करून त्या कुटूबियांचे धर्मांतराचे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असलेल्या गेळे कुटुबियांचे हॉटेलवर संध्याकाळी शुकशुकाट होता.
आटपाडी येथील वरद हॉस्पिटल मध्ये संजय गेळे व त्याची पत्नी अश्विनी गेळे या अतिदक्षता विभागामध्ये जावून रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र करताना व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत असून सदर व्यक्तींच्या कृत्याला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे.
परंतु सदर प्रकरणामध्ये संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत निवेदनाद्वारे तक्रार दिली असून यामध्ये त्या रुग्णावर सदरचा व्यक्ती हा मंत्र-तंत्र करून जबरद्स्तीने धर्मांतराचे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे. तर अनेक संघटनांनी या मध्ये भाग घेत पोलीस ठाणे निवेदन दिले असून, अजून ही काही संघटना उद्या निवेदन देण्यात आहेत.