Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २३ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 660

मेष:-
स्वत:साठी वेळ काढावा. धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल.

 

वृषभ:-
सहकार्‍यांशी सामंजस्याने वागावे. आरोग्याची काळजी घ्यावी. उगाचच हुरळून जाऊ नका. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे.

Manganga

मिथुन:-
आजचा दिवस ताजातवाना असेल. चारचौघात कौतुक केले जाईल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. नवविवाहिताना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल.

 

कर्क:-
योग साधना करावी. विरोधकांपासून सावध राहावे. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

 

सिंह:-
तुमची एकाग्रता वाढेल. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल.

 

 

कन्या:-
साफसफाईची कामे काढाल. जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल.

 

तूळ:-
पराक्रमात वाढ होईल. ओळखीचे लोक भेटतील. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल.

 

वृश्चिक:-
बोलण्यात गोडवा ठेवाल. देणी फेडता येतील. आवडीच्या गोष्टी कराल. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी.

 

धनू:-
मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल. बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल.

 

मकर:-
नकारात्मकता दूर सारावी. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका.

 

कुंभ:-
गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. विविध स्तरातून लाभ संभवतो. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल.

 

मीन:-
रखडलेले काम पूर्ण होईल. हातातील कामातून समाधान मिळेल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. कामात चंचलता आड आणू नका. वडीलांशी संबंध सुधारतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!