नवी दिल्ली : अचानक नोकरी गेली तरी तुम्हाला रोजचा व्यवहार करता येणे सोप्पं व्हावं यासाठी काही तजवीज होऊ शकते.काही विमा योजना आणि पॉलिसी आहेत, ज्या नोकरी गमावल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा देतात. भारतात कर्मचाऱ्यांची सुरक्षा कर्मचारी राज्य विमा म्हणजे ESI करते. त्याआधारे कर्मचाऱ्याला उपचार आणि इतर सुविधा प्रदान करण्यात येतात. अत्यल्प दरात ही सुविधा मिळते.
राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना आणि अटल विमा व्यक्ती कल्याण योजना या दोन योजना तुमच्या मदतीला धावून येतील. या योजना दरमहा एक निश्चित रक्कम देतील. राजीव गांधी श्रमिक कल्याण योजनेत लोकांना मदत करण्यात येते. नोकरी गेल्यानंतर आर्थिक मदत मिळते. ESIC ने 2005 मध्ये ही योजना अंमलात आणली होती. नोकरी गेल्यानंतर 50 रक्कम बेरोजगारी भत्याच्या रुपाने मिळते. ही मदत दोन वर्षापर्यंत मिळते.
तसेच, अटल विमा व्यक्ति कल्याण योजनेतही नोकरी गेल्यानंतर केंद्र सरकार आर्थिक मदत करते. या योजनेत केवळ तीन महिन्यांसाठी आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेत तुमच्या वेतनाच्या 50 टक्के हिश्यावर दावा करता येतो. नोकरी सुटल्याच्या एका महिन्यानंतरच दावा करता येतो.