आटपाडी: आटपाडीतील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न केला जात होता. याला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे.
माहितीनुसार, मंत्रतंत्र आणि जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे. हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद झाला आहे.