नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, ३२ वर्षांची जयंत पाटील यांची कारकिर्द आहे. आम्ही त्यांना जवळून बघतो. त्यांचा स्वभाव शांत, संयमी आहे. पण, त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांच्या कामकाजात निर्लज्जांसारखं का वागता तुम्ही. काही दिवसांची चर्चा होऊ द्या. विरोधकांनाही आपली बाजू मांडण्याचा संधी द्या. अशापद्धतीनं ते सांगत होते, असे अजित पवार म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “सत्ता त्यांची आहे. हम करो सो कायदा आहे. सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहे. सर्व विरोधी पक्षाचे सदस्य आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यात पवार कुटुंबाचे दोन सदस्य आहेत, तेही त्यांच्या पाठीशी आहेत. जे काही मला दिसते ते स्पष्ट बोलणारा माणूस आहे. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जिथं चुकीचं असेल, तिथं मी त्यांनी चुकीचं दाखविण्याचं काम करणार, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.